1 minute reading time (299 words)

[maharashtratimes]कुटुंबातील संघर्ष वाढणार? दादांच्या बालेकिल्ल्यात ताईंचे रणशिंग

कुटुंबातील संघर्ष वाढणार? दादांच्या बालेकिल्ल्यात ताईंचे रणशिं

म. टा. प्रतिनिधी, पुणे : 'पुण्याचे बरेच कारभारी बदलले आहेत. यामुळे मलाही पुण्यात थोडे काम करावे लागणार आहे. सर्वांप्रमाणे माझ्या आयुष्यातही संघर्ष आला आहे,' असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कामकाजात लक्ष घालणार असल्याचे संकेत दिले.

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत रविवारी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाले. उद्घाटनावेळी प्रसिद्ध उद्योजक डॉ. संजय मालपाणी, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप, लोककलावंत प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, छायाचित्रकार स्वागत थोरात, लावणी कलावंत रूपा आणि दीपा परभणीकर यांना श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्काराने आणि शिरीष बोधनी यांचा विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, मोहन जोशी, रमेश बागवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, महोत्सवाचे आयोजक आबा बागुल, जयश्री बागुल यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

'पुण्यात नगरसेवक नसल्याने सगळ्याच कामांसाठी मला फोन येत आहेत. 'ट्रिपल इंजिन' सरकारने सर्व्हे बघणे बंद करून निवडणुका वेळेत घ्याव्यात,' अशी मागणी सुळे यांनी केली. 'या महोत्सवाच्या पुढील म्हणजे तिसाव्या वर्षी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना नक्की बोलवाल,' अशी खात्री सुळे यांनी व्यक्त केली.मालपाणी आणि जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटनावेळी 'ओम कालिका' हे नृत्य सादरीकरण, विविध लोककला, 'शिवराज्याभिषेक', 'महाराष्ट्राच्या महानायिका' आणि 'स्वीट ९० आशा' हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.

'महिला विधेयकातही 'जुमलेबाजी''

'महिला आरक्षणाच्या विधेयकाला कोणतेही राजकीय मतभेद मनात न ठेवता 'इंडिया'ने पाठींबा दिला. मात्र, त्यातही जुमलेबाजी झाली असून, त्यामध्ये तारखेचा कोणताही उल्लेख नसल्याचे लक्षात आले. या विधेयकाची अंमलबजावणी २०२९पर्यंत होऊ शकत नाहीत. 'इंडिया'चे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी नक्की करू' असे आश्वासनही सुळे यांनी या वेळी दिले.

[pudhari]सरकारच्या हलगर्जीपणामुळे ‘समृद्धी’वर अपघा...
[sakal]पुण्यात कारभारी बरेच बदललेत, आता मला पुण्या...