1 minute reading time (94 words)

[News State Maharashtra Goa]ट्रिपल इंजिन आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात-खासदार सुप्रिया सुळे

maxresdefault-43

खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरचे आहेत. इंदापूरमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यानंतर दूध आणि कांदा तसेच अन्य शेतमालाचे दर गडगडले आहेत. दरासाठी इंदापूर तहसीलदारांना त्यांनी पत्र दिले आहे.कांद्यावर शेतकऱ्यांना सरकारने निर्यात शुल्क लावले आहे. ते निर्यात शुल्क मागे घ्यावे अशी देखील मागणी या पत्राद्वारे सरकारला केली आहे. तसेच शेतमालाचे दर वाढवावे अशी पत्रातून मागणी केली आहे.यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.ट्रिपल इंजिन सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.पहिला यू टर्न सरकारला शेतर्कर्यांनी घ्यायला लावला.हे सरकार असंवेदनशील आहे.त्यांच्या कॅबिनेट मध्ये भांडण होत आहेत असा आरोप ही सुळे यांनी केला.

[lokmat]माझ्याकडेही पर्याय होता, पण शरद पवारांना स...
[Times Now Marathi]ट्रिपल इंजिन सरकार असंवेदनशील, ...