1 minute reading time
(84 words)
[News State Maharashtra Goa]सुप्रिया सुळे यांची राहू येथील कार्यक्रमातून लाईव्ह
शेतीमालाला बाजारभाव नाही. राज्यातील महिलांना तुटपुंजी मदत करण्यापेक्षा तिचे संरक्षण करा. केंद्र आणि राज्य सरकारचा पापांचा घडा भरलेला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सत्तेवर येणार असल्याची ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.राहू (ता. दौंड) येथे राहू-खामगाव जिल्हापरिषद गटनिहाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी सुळे बोलत होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (ता.२३) दौंड तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झालेल्या विद्यालयाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी खासदार सुळे यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.