[लोकसत्ता] सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट
उद्घाटन कार्यक्रमात घडली घटना!
पुण्यातील एका कार्यक्रमाचे उद्घाटन करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचाकनपणे पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही. साडीला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी ती विझवली.
सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी दीपप्रज्वलन करताना सुळे यांच्या साडीने पेट घेतला. मात्र ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुप्रिया सुळे यांनी बाजूला होत लगेच साडीला लागलेली आग विझवली.
सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट, पुण्यातील उद्घाटन कार्यक्रमात घडली घटना https://t.co/ctM3gsOKMn#SupriyaSule #NCPs pic.twitter.com/j3tktg8wQZ
— LoksattaLive (@LoksattaLive) January 15, 2023
या दुर्घटनेनंतर मला कसलीही इजा झाली नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. "आमचे हितचिंतक, नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे; की मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये.आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. सर्वांचे मनापासून आभार," अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
