2 minutes reading time (324 words)

[Sakal]सीएसआर फंडातून मुळशीतील शाळांना संगणक वाटप

मुळशीतील शाळांना संगणक वाटप

शाळांना १८० संगणकांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वाटप

हिंजवडी येथील सिनेक्रॉन टेक्नॉलॉजी कंपनीच्या सीएसआर फंडातून मुळशी तालुक्यातील प्राथमिक शाळांना १८० संगणकांचे वाटप खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते घोटावडे (ता. मुळशी) येथे करण्यात आले. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ हगवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, बाजार समितीचे संचालक दगडू करंजावणे, अंजली कांबळे, राधिका कोंढरे, सचिन जांभूळकर नीलेश पाडाळे, सुरेश हुलावळे, कुंडलिक जांभूळकर, प्रदिप भेगडे, अंकुश मोरे, नीलेश गोडांबे, राहुल पवळे, गणेश जांभूळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मल्हारी शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.

माजी सभापती ओझरकर, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबाजी शेळके, पीएमआरडीचे संचालक सुखदेव तापकीर,यांनी संगणक वाटपासाठी पुढाकार घेतला. यावेळी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुळे म्हणाल्या, ''पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा सामाजिक उपक्रमास पुढाकार घेतल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण चांगली सोय होणार आहे.''

''गावांच्या वाडीवस्ती पर्यंत संगणकामुळे ज्ञान गंगा पोहचेल. मावळचे खासदार विकासाबाबत काहीच करत नाही. ते फक्त संसदरत्न आहेत,''अशी टिका आमदार सुनील शेळके यांनी नाव न घेता श्रीरंग बारणे यांच्यावर केली.''येथील आमदार विकास कामाबाबत काहीच सहकार्य करत नाहीत. पाच लाख रुपयांचा विकासनिधी त्या॔च्याकडून मिळणे अवघड जाते, अशी टीका माजी सभापती पांडुरंग ओझरकर यांनी नाव न घेता संग्राम थोपटे यांच्यावर केली.'' कंपनीचे कार्यकारी संचालक राजेंद्र आगळे, म्हणाले, ''समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून गरज आहे, तिथे मदत कंपनी करत असते. राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नीलेश भोईर यांच्या सहकार्यातून ही मदत पोचवू शकलो.''

''मंजूर केलेल्या कामाला सध्याच्या सरकारने स्थगिती दिली. त्यामुळे जनतेच्या विकास कामाचे मोठे नुकसान होत आहे. 'इ' म्हणजे एकनाथ, 'डी' म्हणजे देवेंद्र असे हे 'इडी' सरकार आहे. जनतेने त्यांना 'खोके सरकार' ठरवल्यामुळे त्यांच्या आमदारांना मानहानी सहन करावी लागत आहे. तुकाराम महाराजांच्या विरोधात सध्या ते बोलत असतात. त्यांच्या विरोधात आवाज उठवणार आहे.
- सुप्रिया सुळे, खासदार


...

मुळशीतील शाळांना संगणक वाटप | Sakal

Read Latest & Breaking Marathi News on Politics, Finance, Bollywood, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle & Business. ताज्या मराठी बातम्या एकाच ठिकाणी eSakal वर!
[Lokmat]बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार...
[ABP Majha]सुप्रिया सुळे बैलगाडीतून स्ट्रॉबेरीच्या...