2 minutes reading time (373 words)

[abplive]बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करा

बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करा

टंचाईचा आढावा घ्या; सुप्रिया सुळेंची शासनाकडे मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा (Baramati News) अतिशय कमी (Rain) पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई (Water Tanking)निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. शासनाने तातडीने टंचाईचा आढावा घेऊन बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

खासदारांना सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांना टॅग करत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना पशुधन जगवावे कसे याची चिंता आहे. पिण्याच्या पाण्याची देखील मोठी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशांना भटकण्याची वेळ आलीय. आणखी उन्हाळा सुरू व्हायचा आहे, तोवरच ही परिस्थिती असून ती पुढील काही दिवसांत आणखी भीषण होऊ शकते, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शासनाला ही सर्व परिस्थिती दिसत असूनही त्यावर योग्य ती उपाययोजना होताना दिसत नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे, असे सांगत सुळे यांनी, 'नागरिकांना होणारा त्रास बघूनही शासन शांत कसे बसू शकते याचे आश्चर्य वाटते', असे पुढे नमूद केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी बारामती लोकसभा मतदारसंघातील टंचाईचा आढावा घेऊन तातडीने चारा छावण्या आणि पाण्याचे टॅंकर सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. 

मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट

यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, भर उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच, जायकवाडी धरणातून यंदा उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय देखील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) प्रशासकांनी घेतला आहे. यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. अशात जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर जालनाजिल्ह्यासह औद्योगिक वसाहतींना जायकवाडी प्रकल्पातूनच पाणीपुरवठा होतो. सध्या जायकवाडी धरणात 38.42 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

...

Baramati News MP Supriya Sule Speak for Baramati Lok Sabha Water Tanker Isuues lettest marathi news | Baramati News : बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करा,टंचाईचा आढावा घ्या; सुप्रिया सुळेंची शासनाकडे मागणी

Baramati News : बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करा,टंचाईचा आढावा घ्या, अशी खासदार सुप्रिया सुळेंची शासनाकडे मागणी केली आहे.
बारामतीत सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर शाई फेकली
[sakal]बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि...