1 minute reading time (200 words)

[the karbhari]बारामती लोकसभा मतदार संघात पाण्याचे नियोजन करा

E9209B6D-DF21-4414-9558-D4E8674FABE9-2

खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

 बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Loksabha Consistency) सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न (Water issues in Baramati) हळूहळू गंभीर होत चालला आहे. यामुळे तातडीने पाण्याच्या संदर्भाने दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे, तरी तातडीने बैठकी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

खासदार सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून मुख्यमंत्री तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही त्यांनी टॅग केले आहे.दुष्काळी आढावा बैठकीत पिण्याचे तसेच शेती आणि जनावरांच्या पाण्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष देऊन उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने या बैठकीचे आयोजन करावे, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर, महिलांस...
[sakal]मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन पाण्याचे...