1 minute reading time (250 words)

[loksatta]“मी आणि अजितदादाने हा सिनेमा पाहिला”

“मी आणि अजितदादाने हा सिनेमा पाहिला”

TDM चित्रपटासाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, "बारामतीतील सुपुत्र…"

'टीडीएम' हा मराठी चित्रपट येत्या ९ जूनला पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. भाऊराव कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित झाला होता. परंतु, चित्रपटाला सिनेमागृहांत स्क्रीन न मिळाल्याने 'टीडीएम' पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय दिग्दर्शक व चित्रपटाच्या टीमने घेतला. अनेक कलाकारांनी भाऊराव कऱ्हाडे यांच्या या चित्रपटाला स्क्रीन मिळण्यासाठी पोस्टही केल्या होत्या. आता खासदार सुप्रिया सुळेंनी टीडीएम चित्रपटासाठी एक पोस्ट केली आहे.

सुप्रिया सुळेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'टीडीएम' चित्रपटातील एका कलाकाराने नुकतीच सुप्रिया सुळेंची भेट घेतली. ऋषी काळे असं या कलाकाराचं नाव असून तो 'टीडीएम' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या पोस्टमधून 'टीडीएम' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन केलं आहे. तसंच अजित पवार व सुप्रिया सुळेंनी हा सिनेमा पाहिल्याचं त्यांनी व्हिडीओत म्हटलं आहे.

"आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याचे सुपुत्र आणि विद्या प्रतिष्ठानचे माजी विद्यार्थी ऋषि विलास काळे यांची भेट झाली. ऋषी लवकरच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. भेटीदरम्यान त्याचा कलाक्षेत्रातील प्रवास जाणून घेऊन त्याचे अभिनंदन केले. त्याला ९ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. आपणही सर्वांनी हा चित्रपट नक्की पाहा," असं सुप्रिया सुळेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

[the karbhari]बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक ...
[letsupp]टीडीएम सिनेमासाठी सुप्रिया सुळेंची खास पो...