[Sakal]शुरा कौन्सिलच्या सदस्यांशी चर्चा; सुप्रिया सुळे यांच्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती
दोहा : आॅपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी कतार येथे दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने रविवारी येथील शुरा कौन्सिलच्या उपाध्यक्षा हमदा बिंत हसन अल सुलैती यांच्यासह शुरा कौन्सिलच्या अन्य सदस्यांची रविवारी भेट घेतली. .यावेळी भारतीय शिष्टमंडळाने शुरा कौन्सिलच्या सदस्यांना आॅपरेशन सिंदूरची माहिती दिली, त्याचप्रमाणे भारत दहशतवादाशी कशापद्धतीने लढत आहे, याची माहिती दिली.
कतार येथे दाखल झालेल्या या शिष्टमंडळाने, दोहा येथील भारतीय दूतावासातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास रविवारी सकाळी अभिवादन केले..या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राजीव प्रताप रूडी(भाजप), विक्रमजित सिंह साहनी(आप), मनीष तिवारी(काँग्रेस), अनुरागसिंह ठाकूर(भाजप), लवु श्रीकृष्ण देवरयलू(टीडीपी), आनंद शर्मा(काँग्रेस), व्ही. मुरलीधरन(भाजप) आणि माजी राजनैतिक अधिकारी सय्यद अकबरुद्दीन यांचा समावेश आहे..हे शिष्टमंडळ इजिप्त, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचाही दौरा करणार आहे. हे शिष्टमंडळ भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका कतारसह अन्य देशांना सांगणार आहे.
दहशतवादविरोधात भारत ठामपणे उभा; शशी थरूर यांचा निर्धार, सर्वपक्षीय शिष्टमंडळ अमेरिकेत दाखल.''सर्व प्रकारच्या दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे आणि दहशतवादाबाबत कोणतीही सहनशीलता न दाखवणे हे भारताचे धोरण आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगण्यासाठी भारताच्यावतीने हे शिष्टमंडळ पाठविण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी समाज माध्यमातून सांगितले.
