1 minute reading time (118 words)

[TV9 Marathi]महाराष्ट्रात सध्या गुंडाराज सुरु - सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात सध्या गुंडाराज सुरु - सुप्रिया सुळे

देशात सध्या लोकशाही राहिलेली नाही, ही सरकारची दडपशाहीच सुरू आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र राहिलेला नाही, सध्या गुंडाराज सुरू आहे. या गुंडगिरीच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढणार आहोत, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना व्यक्त केले. सुप्रिया सुळे या बारामती दौर्‍यावर असताना बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. पुढे सुळे म्हणाल्या की, पाण्याच्या टंचाईबाबत राज्य सरकारला अनेक माध्यमातून विनंती केली, तसेच बेरोजगारी बाबत देखील केंद्र सरकारला अनेकदा सांगून देखील फायदा होत नाही. सरकार कोणतीच भूमिका घ्यायला तयार नाही, शेतकर्‍याला हमीभावही मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे. शेतकर्‍यांच्या विरोधातील हे सरकार असून, शेतकर्‍यांनी जर पिकविण्याचे बंद केले तर या देशाचे काय होईल, असा सवाल उपस्थित करीत सरकारने वेळीच याविषयी विचार केला पाहिजे असेही व्यक्त केले.

[azadmarathi]निखील वागळे यांच्यावर हल्ला होत असतान...
[sarkarnama]पुण्यातील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे आक...