2 minutes reading time (386 words)

[Lokmat]तर 'मविआ' चे १९० ते २०० आमदार, ३४ ते ३६ खासदार निवडून येतील

तर 'मविआ' चे १९० ते २०० आमदार, ३४ ते ३६ खासदार निवडून येतील खासदार सुप्रिया सुळे यांचे महत्वाचे राजकीय वक्तव्य

खासदार सुप्रिया सुळे यांचे महत्वाचे राजकीय वक्तव्य

बारामती : एकीकडे भाजप बारामती लोकसभा मतदारसंघ घेरण्याची राजकीय रणनीती आखत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या एका सर्व्हेबाबत माहिती दिली.त्यानुसार आज जर महाराष्ट्रात निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडीचे १९० ते २०० आमदार आणि ३४ ते ३६ खासदार निवडून येतील, असा सर्व्हे समोर आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथे बोलताना दिली.

खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यात शहरातील आमराई परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील घरकुलाची पाहणी करत माहिती घेतली. यावेळी बोलताना सुळे यांनी महत्वाचे राजकीय वक्तव्य केले आहे. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, स्थानिक नगरसेवक बिरजू मांढरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माळेगांव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, वनिता बनकर आदी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, पुण्यासारख्या ठिकाणी सध्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोयता आणि गँग हे माहित आहे. पण कोयता गँग हा शब्द काय आपल्याला माहित नाही. महिला रस्त्यात थांबून मला सांगतात. आमच्या मुली शाळा कॉलेजला जातात आम्हाला काळजी वाटते. तुम्ही गृहमंत्र्यांची भेट घ्या व यावर चर्चा करा,असे त्या महिला सांगतात. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी आहे. गृहमंत्री म्हणून त्यांच्या कामाला फारसे यश आलेले दिसत नसल्याचे सुळे म्हणाल्या. कारण महाराष्ट्र शासनाचा अहवाल असे सांगतो की, गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. ही अतिशय गंभीर आहे बाब असल्याचे देखील सुळे यांनी सांगितले.

अनेक जण असे आरोप करतात की सर्व निधी बारामतीला नेला जातो. यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, बारामतीला तर निधी दिलाच आहे, तो बारामतीकरांचा अधिकार आहे. मात्र इतर तालुक्यांना उपाशी ठेवून बारामतीला निधी दिल्याचे मला मान्य नाही. सासवड जेजुरीचे उदाहरण यावेळी सुळे यांनी दिले. जेजुरी मंदिर आणि परिसर विकसित करण्यासाठी साडेचारशे कोटींचा निधी दिला आहे. सासवड शहराला अडीचशे कोटी दिला आहे. सर्वत्र सर्वांगीण विकास कसा होईल याकडे 'अजितदादां'नी सातत्य ठेवल्याचे खासदार सुळे म्हणाल्या.

...

...तर ‘मविआ’ चे १९० ते २०० आमदार, ३४ ते ३६ खासदार निवडून येतील - सुप्रिया सुळे - Marathi News | ...while 'Mavia' will get 190 to 200 MLAs, 34 to 36 MPs - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

...while 'Mavia' will get 190 to 200 MLAs, 34 to 36 MPs - Supriya Sule. सुप्रिया सुळे यांनी मात्र राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या एका सर्व्हेबाबत माहिती दिली - Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest pune news in Marathi at Lokmat.com
[Maharashtra Times]आज निवडणूक लागली तर मविआचे २०० ...
[News 18 Lokmat]'तर मी आणि दादाने हॉटेल किंवा मॅट्...