1 minute reading time
(216 words)
[Pudhari]निरा-बारामती राष्ट्रीय महामार्ग घोषित करा
खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती लोकसभा मतदारसंघातील पालखी मार्ग आणि लोणंद (सातारा) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा निरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करून तो राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सध्या हा रस्ता राज्य मार्ग आहे.
केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार सुळे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे. माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे यांनी खा. सुळे यांच्या वतीने गडकरी यांना हे पत्र दिले.राष्ट्रीय महामार्ग ९६५ संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग (निरा जंक्शन येथे) आणि राष्ट्रीय महामार्ग ९६५ डी लोणंद सातारा रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग १६० यांना जोडणारा निरा बारामती मार्ग (४१ कि.मी., ढवाण पाटील चौक) हा रस्ता वर्दळीचा असून तो राष्ट्रीय महामार्ग करावा, अशी स्थानिक नागरिकांचीही मागणी आहे. हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करुन तो राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करावा, असे सुळे यांनी या पत्रात म्हटले आहे.
पुणे : निरा-बारामती राष्ट्रीय महामार्ग घोषित करा, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी | पुढारी
बारामती लोकसभा मतदारसंघातील पालखी मार्ग आणि लोणंद (सातारा) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा निरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करून तो राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सध्या हा रस्ता राज्य मार्ग आहे.