1 minute reading time (148 words)

राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात होणारी प्रगती निराशजनक – सुप्रिया सुळे

राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात होणारी प्रगती निराशजनक – सुप्रिया सुळे

  राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात होणारी प्रगती निराशजनक

पुणे : राज्यातील १३०० मराठी शाळा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सुरवातीपासूनच विरोधकांकडून टीका होतीये. याच मुद्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधलाय. राज्यात शैक्षणिक क्षेत्रात होणारी प्रगती निराशजनक सल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलतं होत्या.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राज्यातील १३०० मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय वादग्रस्त असून, शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. राज्याचा शिक्षणातील क्रमांक १६ वरून ३ वर आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्याला कसलाही आधार नसून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री त्याबाबत स्पष्टीकरण देत नाहीत, हे खेदजनक असल्याचे त्यांनी म्हंटले.

दरम्यान, २ दिवसांपूर्वी त्यांनी टीका करताना मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे ट्युशन लावायला हवी, म्हणजे राज्यातील विकास कामे तरी लवकरात लवकर पूर्ण होतील, त्यासाठी जास्त अभ्यास करावा लागणार नाही असं म्हंटलं होतं.

https://maharashtradesha.com/states-education-percentage-slips-says-supriya-sule-1223/

Supriya Sule slams move to close schools
राज्याचा शिक्षणातील टक्का घसरला - सुप्रिया सुळे