1 minute reading time (213 words)

[लोकसत्ता]‘अनेक वेळा मला दादाच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं’

‘अनेक वेळा मला दादाच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं’ सुप्रिया सुळे यांचे विधान

सुप्रिया सुळे यांचे विधान

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचा उल्लेख विधानसभेत केला. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. भाजपाने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर आंदोलन केले. यावर अजित पवारांच्या भगिनी आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अनेक वेळा मला दादाच मुख्यमंत्री असल्याच वाटत असल्याचं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधला.

बेळगाव प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही भूमिका मांडताना दिसत नाही. त्यावर त्या म्हणाल्या की, बेळगाव प्रश्नावर अमित शाह यांच्यासोबत महाविकास आघाडीतील खासदाराची बैठक झाली. त्याबद्दल मी अमित शाह यांचे आभार मानते. त्यावर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून चर्चा केली. याप्रकरणी कोणी काही बोलणार नाही. न्यायप्रविष्ट बाब असल्याच अमित शाह यांनी त्यावेळी सांगितले होते. तरीदेखील कर्नाटकचे मुख्यमंत्री सतत विधान करीत आहेत. ऐरवी आपले ईडी सरकार सतत बोलत राहतात. पण यावर काही बोलण्यास तयार नसून दोघे जण बोटचेपी भूमिका घेत आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असून कोणीही याव आणि महाराष्ट्राला टपली मारून जावे. आम्ही हे कधीच सहन करणार नाही. या कृतीतून महाराष्ट्राच महत्व कमी करण्याच काम अदृश्य हात करीत सांगत भाजपावर त्यांनी टीका केली.

[MumbaiTak]खासदार सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद
[TV9 Marathi]'राष्ट्रवादी काँग्रेसचं काम म्हणजे वि...