1 minute reading time (158 words)

[Checkmate Times]Anjani National School चे Supriya Sule यांच्या हस्ते उद्घाटन

Anjani National School चे Supriya Sule यांच्या हस्ते उद्घाटन

क्रीडो पॉवर कन्सेप्टची पहिली शाळा

मुलांनी खेळता खेळता शिकले पाहिजे, नव्हे तर खेळताना पण तांत्रिकदृष्ट्या खेळले पाहिजे अशा संकल्पनेतून "ओशन ऑफ नॉलेज" या टॅग लाईन खाली कोंढवे धावडे मध्ये सुरु करण्यात आलेल्या अंजनी नॅशनल स्कूलचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. क्रीडो पॉवर कन्सेप्टची या भागातील हि पहिलीच शाळा आहे. यावेळी त्रिंबक मोकाशी, काका चव्हाण, सचिन दोडके, अनिता इंगळे, नितीन वाघ, सुरेश गुजर, सुभाष नाणेकर, अतुल दांगट, प्रवीण दांगट, विकास नाना दांगट, सुहास धावडे, उमेश सरपाटील, राहुल धावडे, संतोष शेलार, मारुती किंडरे, माणिक मोकाशी, शुक्राचार्य वांजळे, युवराज वांजळे, सुरेश धावडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, खडकवासला विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कौतुकास्पद कामगिरी केलेल्या भागातील नागरिकांचा सुळे यांच्या हस्ते विशेष सन्मान करून, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन कोंढवे धावडेचे माजी सरपंच बबनराव धावडे, माजी उपसरपंच अतुल धावडे, नवनाथ धावडे, शाळेच्या संचालिका सोनाली धावडे आणि सुवर्णा धावडे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.0 

[Rajgad News Live]खा सुप्रिया सुळे यांचा कोंढणपूर ...
[LOKMAT]पुण्यात सुप्रिया सुळेंचं जोरदार स्वागत, सु...