1 minute reading time (279 words)

संसदेत आवाज बारामतीचा, खा.सुळे उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित

संसदेत आवाज बारामतीचा, खा.सुळे उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित

संसदेत बारामतीचा आवाज

लोकसभेत 95 टक्के उपस्थिती, कामकाजात 90 टक्के सामाजिक सहभाग बारामती : प्रतिनिधी दिल्ली येथील फेम इंडिया संस्थेच्यावतीने देण्यात येणारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार यंदा बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रे सच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. यामुळे यंदाही संसदेत बारामतीचा आवाज घुमच्याचे दिसते. शनिवारी (दि. 30) सकाळी साडेदहा वाजता दिल्लीतील विज्ञान भवनाच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत खा.सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरीभाई चौधरी, माजी खासदार जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्यासह कार्तिकेय शर्मा, राजीव मिश्रा, ‘फेम’चे प्रमुख संदीप मारवाह आणि उमाशंकर सोंथालिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या मतदार संघात खासदारांनी केलेली कामे, अधिवेशन काळात संसद भवनात किती प्रभावीपणे त्यांनी प्रश्न उपस्थित केले, या आणि अशा अनेक मुद्यांवर फेम इंडिया आणि आशिया पोस्ट या दोन संस्था सर्व्हेक्षण करुन देशभरातील 25 खासदारांची निवड करतात. संसदेत सर्वाधिक 96 टक्के प्रश्न उपस्थित करून अव्वल ठरलेल्या खा. सुप्रिया सुळे या सर्वेक्षणात प्रथम क्रमांकाचा नारीशक्ती पुरस्कार देण्यात आला.

हा जनतेचा सन्मान : सुळे ‘फेम इंडिया’ संस्थेतर्फे सर्वोत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी दिला जाणारा यंदाचा ‘श्रेष्ठ सांसद पुरस्कार’ मला मिळाला. ‘माझा मतदारसंघ आणि राज्यातील जनतेचा विश्वासाच्या बळावर संसदेत मला त्यांचे प्रश्न मांडता आले. हा सन्मान माझ्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवणार्‍या तमाम जनतेचा असल्याची भावना खा. सुळे यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली.

फेम इंडिया आणि आशिया पोस्ट या संस्थांनी केलेया सर्वेक्षणात खा.सुळे यांनी संसदीय कामकाजात 90 टक्के सामाजिक सहभाग व 72 टक्के चर्चेत सहभाग नोंदवत मंंजुरीसाठी सभागृहात आलेल्या विविध बिलांवरील चर्चेत 92 टक्के, संसदेत अनेक विषयांवर 98 टक्के प्रश्न उपस्थिती, संसदेतील कामकाजात 95 टक्के उपस्थिती, प्रदेश तसेच पक्षातील त्यांचा प्रभाव 93 टक्के, कार्यशैलीसाठी 94 टक्के आणि सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ आदींबाबतीत 80 टक्के गुण पटकावले आहेत.

Read more at http://baramatipride.com/article_view?id=2339&catid=1#3fuBSm42880hrdy8.99

सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार