1 minute reading time (267 words)

भोर आणि राजगड तालुक्यांतील उड्डाणपुलांवर ऐतिहासिक प्रसंग चितरण्याबरोबरच दिशादर्शक फलक लावा

भोर आणि राजगड तालुक्यांतील उड्डाणपुलांवर ऐतिहासिक प्रसंग चितरण्याबरोबरच दिशादर्शक फलक लावा

खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्राकडे पत्राद्वारे मागणी


पुणे : भोर आणि राजगड तालुक्यातील महामार्गांवर असलेल्या उड्डाण पूलांच्या भिंतींवर त्या त्या ठिकाणचा इतिहास दर्शविणारी भित्तिचित्रे रेखाटण्याबरोबरच दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे पत्राद्वारे केली आहे.

केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून तसे ट्विट देखील केले आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील भोर आणि राजगड या तालुक्यांना उज्ज्वल ऐतिहासिक वारसा लाभलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भागात अनेक गडकोट आणि ऐतिहासिक गड्या, विहिरी, वाडे, पाणीयोजना आहेत.

या भागातील शिवकालीन ऐतिहासिक स्थळे, किल्ले, धरणे यांबरोबरच विलोभनीय निसर्गसौंदर्याने नटलेला हा परिसर पाहण्यासाठी तसेच ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी सातत्याने या भागात येणाऱ्या शिवप्रेमी आणि पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यांच्या सुविधेसाठी आणि पर्यटनास गती मिळावी यासाठी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ येथे तसेच भोर आणि राजगड तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे जाण्याचा मार्ग दर्शविणारे फलक लावणे अगत्याचे आहे, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

याशिवाय गेल्या काही वर्षांत याभागतील राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर उड्डाणपूल उभे राहिले आहेत. या पुलांच्या भिंतींवर त्या त्या परिसरातील ऐतिहासिक घटनांची चित्रे रंगवली, तर पर्यटकांबरोबरच भावी पिढीला प्रेरणा देखील मिळेल, तरी याबाबत सकारात्मक विचार होऊन लवकरात लवकर फलक लावून भिंती चितरण्यात याव्यात, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले असून फलक लावण्यासाठीच्या जागा सुद्धा त्यांनी सुचवल्या आहेत.

त्या पुढीलप्रमाणे
१. कोंढणपुर फाटा :
किल्ले सिंहगड
श्री तुकाई माता देवस्थान

२. शिवापुर :
कमर अली दरवेश दर्गाह

३. चेलाडी फाटा :
स्वराज्याचे पहिले तोरण - किल्ले तोरणा
स्वराज्याची पहिली राजधानी - किल्ले राजगड

४. कापुरव्होळ :
येसाजी कंक जलाशय (भाटघर धरण)
स्वराज्याची शपथ घेतली ते ठिकाण - श्री रायरेश्वर पठार
किल्ले रोहिडेश्वर
नीरा देवघर धरण
पुरेशा प्रकाश व्यवस्थेने तटबंदीच्या आतही तोरणा गड ...
पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर क...