1 minute reading time
(297 words)
पुरेशा प्रकाश व्यवस्थेने तटबंदीच्या आतही तोरणा गड उजळून निघाला
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीनुसार गडाच्या ऐतिहासिक स्थळांवर विद्युतीकरण पूर्णत्वास
पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून तोरणा किल्ल्यावरील कोठी दरवाजा मेंगाई दरवाजा आणि लक्कडखाना आदी ठिकाणी विद्युतीकरण पूर्ण झाले असून पुरेशा प्रकाश व्यवस्थेने गडावरील तटबंदीच्या आतील ठिकाणेही उजळून निघाली आहेत. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण राजगड, भोर तालुक्यातील नागरिकांसह गडप्रेमींच्या वतीने महावितरण कंपनीचे आभार मानले आहेत.
संपूर्ण राज्य तसेच देशभरातून तोरणा गडावर येणाऱ्या शिवप्रेमी आणि पर्यटकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. कित्येक गडप्रेमी गडावर रात्रीच्या वेळी मुक्कामी सुद्धा राहतात. त्यांच्या सुरक्षेसाठी गडावर पुरेशी प्रकाश व्यवस्था आवश्यक असल्याचे खासदार सुळे यांनी लक्षात आणून दिल्यानंतर गडाच्या तटापर्यंत विद्युतीकरण झाले होते, मात्र कोठी दरवाजा, मेंगाई देवीचे मंदिर आणि लक्कडखाना आदी ज्या ठिकाणी पर्यटक गडावर मुक्काम करतात त्याठिकाणी विद्युतीकरण झाले नव्हते.

ही बाब लक्षात आल्यानंतर गडाच्या तटबंदीच्या आतही वरील ठिकाणी विद्युतीकरण करावे, अशी मागणी सुळे यांनी केली होती. त्यास प्रशासकीय मान्यता देत सप्टेंबर २०२४ मध्ये जिल्हा नियोजन समितीतून सुमारे दहा हजार (९ लाख ७६ हजार ५१७ रुपये) इतका निधी मंजूर झाला होता. या निधीतून गडावरील तटबंदीच्या आतही विद्युतीकरण झाले आहे. गडप्रेमींसाठी त्याचा अत्यंत उपयोग होणार असून निधी मंजूर करत विद्युतीकरण पूर्ण केल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण राजगड, भोर तालुक्यातील नागरिकांसह गडप्रेमींच्या वतीने महावितरण कंपनीचे आभार मानले आहेत.