1 minute reading time
(131 words)
नवनिर्वाचित खासदार सुप्रियाताई सुळे कण्हेरीतील मारुतीरायाच्या चरणी
कण्हेरी, ता. बारामती (प्रतिनिधी ) ः बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज कण्हेरी येथील मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. येथील मारुतीरायावर पवार कुटुंबियांची विशेष श्रद्धा असून ते वारंवार येथे दर्शनास येत असतात.
आदरणीय शरद पवार साहेबांच्या पहिल्या निवडणूकीपासून कण्हेरी येथील मारुतीरायाचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवायची परंपरा पवार कुटुंबियांनी जोपासली आहे. यानंतर निवडणूकीत विजयी झाल्यावरही पवार कुटुंबाचे सदस्य मारुतीरायाचे दर्शन घेऊन आपली श्रद्धा व्यक्त करतात. यानुसार आज सकाळी सकाळी सुप्रियाताईंनी कण्हेरीच्या मंदिरात जाऊन मारुतीरायाचे दर्शन घेतले.
कण्हेरी येथील दर्शन आटोपल्यानंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी त्यांची विचारपूस करुन त्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर त्यांनी सुनंदावहीनी आणि राजेंद्रदादा पवार, शुभांगीवहिनी आणि रणजितअण्णा पवार यांचीही भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

दरम्यान, या कौटुंबिक भेटीनंतर त्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या.