1 minute reading time (145 words)

शितगृहाच्या विजबिलाबाबत महावितरणने फेरविचार करावा - खा. सुप्रिया सुळे

शितगृहाच्या विजबिलाबाबत महावितरणने फेरविचार करावा - खा. सुप्रिया सुळे

पुणे : महावितरणने शीतगृहांच्या वीजबिलांत सुमारे चाळीस टक्क्यांची दरवाढ केली असून पुढील वर्षी ती ५० टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे प्रस्तावित केले आहे. या दरवाढीचा मोठा फटका अन्नप्रक्रिया उद्योग आणि अन्न साठवणूक उद्योगांना बसणार आहे, तरी याबाबत महावितरणने फेरविचार करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

अन्नप्रक्रिया आणि ते साठवणूक करणे हे शेतीपूरक उद्योग असून शीतगृहांची वातानुकूलित व्यवस्था ही पुर्णतः वीजेवर अवलंबून असते. या शीतगृहांमध्ये शेतमाल ठेवण्यात येतो. वीजेची दरवाढ झाल्यामुळे हे आता महागणार असून याचा भुर्दंड शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना देखील सहन करावा लागणार आहे. हे लक्षात घेता महावितरणने या दरवाढीचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे.
पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी मार्गाची नि...
मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणाबाबत खासदार सुप्रिय...