1 minute reading time (293 words)

बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर

बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ३८ कोटी ४० लाख ८७ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.


या निधीतून बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. आता निधी मंजूर झाल्याने तातडीने कामे पूर्ण करावीत, म्हणजे स्थानिक नागरिकांच्या अडचणी दूर होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. या निधीसाठी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकरचेही आभार मानले आहेत.

मंजूर झालेल्या निधी मधून करायची कामे पुढील प्रमाणे -

बारामती तालुका

माळेगाव कारखाना ते २२ फाटा खांडज रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून २०६.५३ लाख आणि राज्य शासनाकडून - १४२.९२ लाख असे एकूण ३४९.४५ लाख रुपये मंजूर

दौंड तालुका

एमआरएल १२ एस एच ६८ ते मोगरवाडी ते दहिटने रस्त्यासाठी केंद्र सरकार कडून १४७.२८ लाख आणि राज्य शासनाकडून - ११०.०९ लाख असे एकूण किंमत - २५७.३७ लाख रुपये मंजूर

इंदापूर तालुका

 वांगली ते गलांडवाडी नरूटवाडी रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून २२६.५१ लाख आणि राज्य शासनाकडून १७४.६६ लाख असे एकूण ४०१.१७ लाख रुपये मंजूर

मुळशी तालुका

पिंपळोली ते पाचणे रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून ३८२.५८ लाख आणि राज्य शासनाकडून २८१.८६ लाख असे एकूण ६६४.४४ लाख रुपये तसेच भांबुर्डे ते बरपे रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून २९६.६ लाख आणि राज्य सरकारकडून २१५.४१ लाख असे एकूण ५१२.०१ लाख रुपये मंजूर

भोर तालुका

कुसगाव खोपी कांजळे साळवडे ते वर्वे बुद्रुक रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून ३३७.४३ लाख आणि राज्य शासनाकडून २२४.९६ लाख असे एकूण ५६२.३९ लाख रुपये मंजूर.

वेल्हा तालुका

केळद ते निगडे कुंभे रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून ३४०.५७ लाख आणि राज्य शासनाकडून २३८.०३ लाख असे एकूण ५७८.६ लाख रुपये तसेच घोल ते रायगड जिल्हा सीमेपर्यंत रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून ३००.९६ लाख आणि राज्य शासनाकडून २१४.४८ लाख असे एकूण ५१५.४४ लाख रुपये मंजूर

रानकवी ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार...
केंद्राच्या योजनांत उघड दुजाभाव होत असल्याचा खासदा...