2 minutes reading time (386 words)

खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान' पुरस्कार जाहीर

खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान' पुरस्कार जाहीर

संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी चेन्नई येथील 'प्राईम पॉईंट फौंडेशन' कडून पुन्हा सन्मान

पुणे : चेन्नई येथील 'प्राईम पॉईंट फौंडेशन'च्या वतीने देण्यात येणाऱ्या 'संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान' या पुरस्कारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. संसदेतील सातत्यपूर्ण उकृष्ट कामगिरी आणि आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी स्थानिक प्रशासनापासून केंद्र सरकारपर्यंत करत असलेल्या प्रश्नांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे 'प्राईम पॉईंट फौंडेशन'चे श्रीनिवासन यांनी कळविले आहे.

विद्यमान १८व्या लोकसभेसह संसदेतील सासत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरीसाठी खासदार सुळे यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे श्रीनिवासन यांनी म्हटले आहे. विद्यमान लोकसभेत सुळे यांची आतापर्यंत ९९ टक्के उपस्थिती असून ती राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर ८७ टक्के इतकी आहे. संसदेच्या एकूण ४७ चर्चासत्रांत सहभागी होत खासदार सुळे यांनी तब्बल ११३ प्रश्न विचारले आहेत. चर्चासत्रांतील त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची टक्केवारी ४७ टक्के इतकी आहे. विद्यमान १८वी लोकसभा चालू झाल्यापासून गेल्या अवघ्या एक वर्षातील त्यांची ही कामगिरी असून यापूर्वीही १५, १६ आणि १७व्या लोकसभेतही त्यांची अशीच उत्कृष्ट अशी कामगिरी राहिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेतील याच सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी चेन्नई येथील याच 'प्राईम पॉईंट फौंडेशन' तर्फे सलग दोनवेळा 'संसद महारत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून 'संसद विशिष्टरत्न' आणि तब्बल आठ वेळा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय फेम इंडियाचा 'नारीशक्ती उत्कृष्ट संसदपटू' पुरस्कार सलग तीन वर्षे, 'द सोफी इंडियन अॅवार्ड', 'देवी पुरस्कार', 'भारत अस्मिता अॅवार्ड' इतकेच नाही तर २०१८ साली आंतरराष्ट्रीय पातळीवरचा युनिसेफचा 'पार्लमेंट्री अॅवार्ड फॉर चिल्ड्रन' हा पुरस्कार सुद्धा खासदार सुळे यांना मिळाला असून लोकमत ग्रुपचा २०१९ सालचा 'उत्कृष्ट महिला संसदपटू' पुरस्कार पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, 'बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकाचा हा पुरस्कार आहे, असे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आपल्याला सेवा करण्याची संधी दिली आणि मतदार संघातील सर्वांनी आपल्यावर सातत्याने विश्वास टाकला, अपार प्रेम दिले. सर्वांची ही माया आणि विश्वास हीच आपली काम करण्याची ऊर्जा आहे. हा पुरस्कार आपल्या मतदारसंघातील जनतेला समर्पित करताना आपल्याला अतिशय आनंद होत आहे', असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे.

चौकट
जागतिक पातळीवर देशाची भूमिका मांडणाऱ्या समितीत समावेश

दहशतवादाविरोधात आपल्या देशाची भूमिका जागतिक पातळीवर मांडण्यासाठी भारत सरकारने नुकत्याच गठीत केलेल्या एका समितीचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजुजी यांनी ही समिती नियुक्त केली असून खासदार सुळे यांच्या नेतृत्वाखालील समितीकडे इजिप्त, कतार, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांत भारताची भूमिका मांडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळी...