1 minute reading time (152 words)

बुडणाऱ्या मुलींचे प्राण वाचवणाऱ्या गोऱ्हे खुर्द येथील शेतकऱ्यांचे खा. सुळेंकडून कौतुक

बुडणाऱ्या मुलींचे प्राण वाचवणाऱ्या गोऱ्हे खुर्द येथील शेतकऱ्यांचे खा. सुळेंकडून कौतुक
पुणे : खडकवासला धरणात बुडणाऱ्या मुलींचे प्राण वाचवणाऱ्या गोऱ्हे खुर्द येथील शेतकऱ्यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले असून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो, असे त्यांनी म्हटले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील नऊ मुली आज सकाळी गोऱ्हे खुर्द येथे खडकवासला धरणात बुडत असल्याचे पाहताच गोऱ्हे खुर्द येथील शेतकरी संजय माताळे यांनी जीवाची पर्वा न करता धरणात उडी मारून बुडणाऱ्या मुलींचे प्राण वाचवले. राजेंद्र जोरी, कालिदास माताळे, शिवाजी माताळे व रमेश भामे यांनी त्यांना सहाय्य करत मुलींना किनाऱ्यावर आणण्यास मदत केली.

या सर्वांच्या अतुलनिय धाडसाबद्दल खुप खुप अभिनंदन. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. आम्हा सर्वांना त्यांचा अभिमान वाटतो, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे. 

बियाणे उद्योगाच्या परराज्यात स्थलांतरित होण्यावरून...
सिंधुदुर्ग येथील विमानतळास बॅ. नाथ पै यांचे नाव द्...