विमानतळ बाधित सात गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत सुप्रिया सुळेंनी चर्चा केली. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर शंका उपस्थित केली आहे. ली. सुप्रिया सुळे यांची विमानतळ होत असलेल्या परिसरात 130 ते 135 एकर जमीन असल्याची शंका शेतकऱ्यांनी उपस्थित केली. सात गावांमध्ये हीच चर्चा असल्याचं देखील उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितलं. पुरंदर तालुक्यामध्ये एक इंच जरी जागा माझ्या नावावर असेल तर ती जागा मी तुमच्या नावे करेन असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.