जर दबावाचा अडेलतट्टूपणा तसाच राहिला तर त्यांच्याशिवाय पुढे जा असा निरोप भाजपा वरिष्ठांकडून राज्यातील नेत्यांना देण्यात आला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथविधी होणार होता. शेवटच्या क्षणी ते तिथे पोहचले असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याला दुजोरा दिला आहे.