पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी भारत-पाकिस्तान आशिया कप सामना आणि नेपाळ आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारत सरकारची भूमिका स्पष्ट होती आणि त्यामुळे मी या नव्या भूमिकेवर आश्चर्यचकित आहे. तसेच, नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटक व व्यावसायिकांशी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून संपर्क साधून मदतीची मागणी केली आहे, असं सुळे यांनी स्पष्ट केलं.