By Editor on Monday, 27 February 2023
Category: पुणे शहर

[Maharashtra Lokmanch]कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न

 पुणे – यशवंतराव चव्हाण सेंटर, सिग्निया आणि महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबीर पार पडले. ७५ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉ. रजनी इंदुलकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. पूर्व तपासणी मध्ये आढळून आलेल्या ऐकू न येण्याच्या क्षमतेनुसार लाभार्थ्यांना दिडशे श्रवणयंत्र मोफत बसविण्यात आले.

याप्रसंगी डॉ. रजनी इंदुलकर, डॉ. सुनील जगताप, सिवान्टोस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ अविनाश पवार, किशालया चक्रवर्ती, सुमुख कसर्ले, वायडेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मधुसूदन भाडे, चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नाखले, विजय कान्हेकर, दत्ता बाळसराफ, दिपिका शेरखाने तसेच कुमार वासनी, विशाल शाह, अमित पाटील हे उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Centre) च्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी २०१३ पासून सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून तब्बल वीस हजार हून अधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे.

चव्हाण सेंटरच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे या करत असलेल्या या स्तुत्य उपक्रमाची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली असून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये सुद्धा त्याची नोंद झाली आहे. बालेवाडी येथे २०१८ मध्ये झालेल्या शिबिरात एका दिवसात म्हणजे अवघ्या ८ तासात तब्बल ४ हजार ८०० लाभार्थ्यांना श्रवणयंत्र बसविण्यात आले होते.

कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न - Maharashtra Lokmanch

Leave Comments