By Editor on Friday, 03 March 2023
Category: Press Note

अत्यावश्यक सेवा खंडित होणे संतापजनक

भोर उपजिल्हा रुग्णालयावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला खडसावले

भोर : आरोग्यासारखी अत्यावश्यक सेवा निधीअभावी खंडीत होणे संतापजनक असल्याचे सांगत भोर येथील उपजिल्हा रुग्णालयाची वीज खंडित झाल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला चांगलेच खडसावले आहे.

थकीत वीज बिलामुळे भोर उपजिल्हा रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावरून खा. सुळे या चांगल्याच संतापल्या असून त्यांनी राज्य शासनाला खडसावले आहे. दहा लाख ६३ हजार रुपये इतके वीजबिल थकल्याचे कारण देत महावितरण कंपनीने या रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी तातडीने याची दखल घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

रुग्णालयांच्या वीज आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठी निधी उपलब्ध करणे हे शासनाचे आद्यकर्तव्य आहे. याची आठवण करून देत तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे. 

Leave Comments