पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ट्विट करत त्यांनी अभिनंदन केले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी नेहमीच आपल्या उत्कष्ट कामगिरीने जनतेचा आवाज सभागृहात मांडण्याचे काम केले आहे. या पुरस्काराने ही बाब पुन्हा अधोरेखित झाली, असे त्यांनी म्हटले आहे. स्वतः खासदार सुळे यांनाही हा पुरस्कार सलग सहा वेळा तर एकदा संसद महारत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.