1 minute reading time
(171 words)
महाविकास आघाडीच्या समर्थक, कार्यकर्त्यांवर दडपशाही मार्गाने सरकारकडून कारवाया
कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर असल्याची ग्वाही देत खा. सुळे यांनी नोंदवला शासनाचा निषेध
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे समर्थक, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या कारवायांचा आम्ही कठोर शब्दात निषेध करतो, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे समर्थक, कार्यकर्ते आणि हितचिंतक सोशल मिडिया आणि इतर माध्यमातून आपल्या भावना आणि भूमिका सातत्याने मांडत असतात. त्यांचा आवाज दडपण्यासाठी त्यांच्यावर खोट्या केसेस टाकल्या जात असून त्यांना विविध मार्गाने छळण्याचे प्रकार वारंवार होत असल्याचा आरोप करत त्यांनी हे निषेधाचे ट्विट केले आहे.

सत्ताधाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या या कारवाया लोकशाहीच्या मूल्यांचा ऱ्हास करणाऱ्या असून शासनाच्या निर्णय किंवा एखाद्या भूमिकेवर व्यक्त होण्याचा सर्वसामान्यांचा घटनात्मक अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. हे अतिशय गंभीर आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे खासदार सुळे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे समर्थक, कार्यकर्ते आणि हितचिंतक सोशल मिडिया आणि इतर माध्यमातून आपल्या भावना आणि भूमिका सातत्याने मांडत असतात.@NCPspeaks @INCMaharashtra @ShivSenaUBT_
— Supriya Sule (@supriya_sule) March 20, 2023