By Editor on Monday, 13 February 2023
Category: Press Note

दहावी बारावीच्या परीक्षांचा कालखंड आणि शेतीची कामे सुरू आहेत, वीजपुरवठा तोडू नका

खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी


पुणे : सध्या राज्यातील शेतीची बहुअंशी कामे सुरू आहेत. शिवाय दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. अशा प्रसंगी वीजपुरवठा खंडित करणे उचित नसल्याचे सांगत महावितरणला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत खासदार सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. महावितरण कंपनीकडून सध्या जोरदार कारवाई सुरू असून राज्यभर मोठ्या प्रमाणात शेती आणि घरगुती वापराची वीज खंडीत केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना तसेच नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या शेतात पिकांना पाणी देण्यापासून इतर कामे सुरु आहेत. त्याचा मोठा खोळंबा होत आहे.

याबरोबरच दहावी व बारावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असल्याने विद्यार्थी त्याची तयारी करीत आहेत. त्यांनाही वीज नसल्याने अभ्यास करताना अडचणी येत आहेत. तेही सध्या सुरु असणारी शेतीची कामे तसेच परीक्षांचा काळ लक्षात घेता नागरीकांचा वीजपुरवठा खंडित करु नये, असे त्यांनी म्हटले आहे. 

Leave Comments