By Editor on Thursday, 02 February 2023
Category: Press Note

नीरा-बारामती मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

 केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांच्याकडे दिले पत्र

पुणे, दि. २ (प्रतिनिधी) - बारामती लोकसभा मतदारसंघातील पालखी मार्ग आणि लोणंद (सातारा) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा नीरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करून तो राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सध्या हा रस्ता राज्य मार्ग आहे. केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांच्याकडे खासदार सुळे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे. माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे यांनी सुळे यांच्या वतीने गडकरी यांना हे पत्र दिले.

​राष्ट्रीय महामार्ग ९६५ संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग (नीरा जंक्शन येथे) आणि राष्ट्रीय महामार्ग ९६५ डी लोणंद सातारा रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग १६० यांना जोडणारा निरा बारामती मार्ग (४१ कि.मी.) (ढवाण पाटील चौक) हा रस्ता वर्दळीचा असून तो राष्ट्रीय महामार्ग करावा, अशी स्थानिक नागरिकांचीही मागणी आहे. तरी हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळ अर्थात एनएचएआय कडे वर्ग करुन तो राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करावा, असे सुळे यांनी या पत्रात म्हटले आहे.

Leave Comments