खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्या आहेत. महिला आणि बालकांचे आरोग्य तथा कुपोषण यांसारख्या अनेक बाबींमध्ये अंगणवाडी सेविकांचे अत्यंत महत्वाचे योगदान असते. त्यांना सरकारने योग्य तो न्याय द्यायला हवा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.राज्यातील शेकडो अंगणवाडी सेविका संपावर आहेत. परिणामी महिला आणि बालकांशी संबंधीत सर्व कारभार ठप्प झाला आहे. या संपाची दखल घेऊन अंगणवाडी सेविकांना न्याय मिळवून द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.