By Editor on Friday, 30 December 2022
Category: पुणे

[लोकसत्ता]नवले पूल परिसर अपघातमुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांची एकत्रित बैठक बोलवा

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

 पुणे-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नवले पूल परिसरात सातत्याने अपघात घडत आहेत. हा परिसर कायमचा अपघातमुक्त करण्यासाठी या ठिकाणी काही सुधारणा करणे गरजेचे आहे. या रस्त्याशी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय), पुणे महापालिका, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (एमएसईबी), महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. (एमएनजीएल) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अशा एकापेक्षा जास्त यंत्रणा सहभागी आहेत. या सर्व यंत्रणांची एकत्र बैठक घेऊन तातडीने या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी केली.

नवले पूल परिसराची खासदार सुळे यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, 'या पुलाबाबत एनएचएआय, महापालिका आणि महावितरणची लवकरच एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत याबाबतच्या तांत्रिक अडचणी सोडविण्याबाबत चर्चा करण्यात येईल. हा परिसर कायमचा अपघातमुक्त करण्यावर आमचा भर आहे. यासाठी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी हे देखील सहकार्य करत आहेत.'नवले पूल परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांचा मुद्दा खासदार सुळे यांनी संसदेतही उपस्थित केला आहे. दिल्लीतून परतल्यानंतर सुळे यांनी बुधवारी नवले पूल परिसराची पाहणी केली.

पुणे: नवले पूल परिसर अपघातमुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांची एकत्रित बैठक बोलवा; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी | MP Supriya Sule demand to call a joint meeting of the relevant agencies to make Navale Pool area accident free pune print news psg 17 amy 95 | Loksatta

Leave Comments