संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची डागडुजी कधी
पुणे : सासवड - जेजुरी रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दुभाजकांची दुरावस्था झाली आहे. या मार्गाची डागडुजी कधी करणार ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावर अपघाताचे काही फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांना हा सवाल विचारला आहे.
या मार्गावर सतत अपघात होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, नागरिकांचे जीव धोक्यात आहेत, त्यामुळे लवकरात लवकर या मार्गाची डागडुजी झाली पाहिजे असेही त्या म्हटल्या आहेत.
या मार्गाशी अनेक भक्तांच्या, भाविकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या जीवाशी खेळ होतोय. त्यामुळे या दुभाजकांची दुरावस्था झाल्याने या भाविकांना मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे पुणे आणि आसपासच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हागणदारी मुक्त महाराष्ट्र या अभियानावर देखील प्रश्न उपस्थित केले होते. तसेच हा केवळ भ्रम आहे, मुख्यमंत्री हॅलिकॉप्टरने फिरतात त्यांना रस्त्यावरील सत्य माहित नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
एकूणच निवडणूक जवळ आली असल्याचे यातून दिसून येत आहे, त्यामुळे निवडणूक जवळ असल्याकारणाने आरोप प्रत्यारोपांचे हे सत्र असेच सुरु राहणार का ? असा प्रश्न देखील याठिकाणी उपस्थित झाला आहे.
http://mahamtb.com/Encyc/2018/4/23/Supriya-sule-asking-questions-to-CM-Fadnavis-.amp.html?__twitter_impression=true