By newseditor on Saturday, 08 September 2018
Category: इंदापूर विधानसभा

मोतिबिंदू शस्त्रक्रिया चा बारामती पॅटर्न इंदापूर तालुक्यात राबविणार - सुप्रिया सुळे




राजकुमार थोरात
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018
वालचंदनगर - मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्याचा ‘बारामती पॅटर्न’ इंदापूर तालुक्यामध्ये राबविणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. कळंब (ता.इंदापूर) येथे उपस्थित गाव भेटी दरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या.
यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब घोलप, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, अभिजित तांबिले, माजी सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत समिती सदस्या डॉ.शैला फडतरे, सारिका लोंढे, माजी सदस्य सुहास डोंबाळे, कळंबच्या सरपंच उज्वला फडतरे, रामचंद्र कदम, योगेश डोंबाळे, पिन्टू डोंबाळे, तुषार घाडगे, कालिदास राऊत उपस्थित होते. यावेळी सुळे यांनी सांगितले की, मागील आठवड्यामध्ये बारामतीमध्ये डॉ.तात्यासाहेब लहाने व डॉ. रागिणी पारेख यांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरासाठी झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने आले होते.

त्यांनी असे शिबीर इंदापूर तालुक्यामध्ये घेण्याची विनंती केल्यामुळे लवकरच इंदापूर तालुक्यामध्ये मोफत मोतिबिंदू शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले. बारामती तालुक्यामध्ये  एन्‍व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या वतीने आत्तापर्यंत ३८३० नागरिकांवरती मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

तसेच वयोश्री, अपंग शिबिराच्या माध्यमातुन अनेक जेष्ठ नागरिकांनी आरोग्याची तपासणी केली आहे. याचा दुसऱ्या टप्याचे काम ही लवकर सुरु होणार आहे. आमदार भरणे, सभापती जगदाळे, झेडपीचे सभापती माने हे विरोधी पक्षातील सरकार असताना देखील जास्तीजास्त निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे तिघांचे ही कौतुक केले.

http://www.esakal.com/paschim-maharashtra/baramati-pattern-cataract-surgery-will-be-implemented-indapur-taluka-supriya
Leave Comments