By newseditor on Tuesday, 29 May 2018
Category: महाराष्ट्र

मी काय खोटे बोलले? ते सांगा : सुप्रिया सुळेंचे विनोद तावडेंना आव्हान








मीनाक्षी गुरव  ; सोमवार, 28 मे 2018
सुप्रिया सुळेंचे विनोद तावडेंना आव्हान



पुणे, ता. 28 ः ""शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. शिक्षणमंत्र्यांनी आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे,'' असे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले.

सरकारच्या शाळा बंदच्या धोरणाचा विरोध दर्शविण्यासाठी सुळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. शाळा बंद करण्याचा निर्णय घेताना सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही पर्यायांचा विचार केलेला नाही. शाळांचे समायोजन करताना शिक्षण हक्क कायद्याचा भंग होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

शिरूर तालुक्‍यामधील भिल्लवस्तीतील शाळा बंद करून तेथील मुलांचे शिंदोडीतील शाळेत समायोजन केले आहे. मात्र, मुलांना शाळेत जाण्यासाठी एक-दीड किलोमीटर नव्हे, तर तब्बल तीन किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे. बारामतीमधील गारमळा येथील विद्यार्थ्यांचीही पायपीट वाढणार आहे. अशाच प्रकारे राज्यातील असंख्य शाळा ग्रामस्थ, ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद यांचा विरोध असतानाही बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. परंतु त्यातून विद्यार्थ्यांची होणारी फरफट दुर्लक्षित राहिली आहे. याचा विचार सरकारने "पालक' म्हणून केलाय का?, असा प्रश्‍न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

शाळा : समायोजन झालेली शाळा : अंतर (किलोमीटरमध्ये)
पवारवस्ती (ता. इंदापूर) : वायसेवाडी : 02
बागलफाटा : बावडा : 2.5
वेलहावळे (ता. खेड) : काळोखेवस्ती : 1.8
शास्ताबाद (ता. शिरूर) : उकीरडेवस्ती : 1.7
भिल्लवस्ती : शिंदोडी : 2.9

http://www.sarkarnama.in/what-i-spoke-lie-supriya-sule-asks-tawde-24317
Leave Comments