रुग्णालयाला निधी द्यायला पैसे नाही-खासदार सुप्रिया सुळे
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाला खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट देवून मृत रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, यापूर्वी ठाणे येथील रुग्णालयांतील अशाच घटनेचे काय झाले. आता नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूरमधील घटनांचे तरी काय होणार आहे. कारण, हे सरकार असंवेदनशील आहे.