By newseditor on Friday, 09 February 2018
Category: महाराष्ट्र

...तर दस नंबरी नागीण स्वभाव दाखवेल : सुप्रिया सुळे

"महिलांच्या नादाला लागू नका, अन्यथा ही दस नंबरी नागीण आपला स्वभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही", असे जळजळीत उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. त्या जळगावमध्ये बोलत होत्या.

"भाजप सुडाचे राजकारण करत आहे. विरोधकांच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत, अशा धमक्या मुख्यमंत्री देत आहेत. मात्र कोणतीही महिला तिच्या गळ्यापर्यंत आल्याशिवाय आवाज काढत नाही. कोणी जर तिला दंश करण्याचा प्रयत्न केला, तर ही दस नंबरी नागीण आपला स्वभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आस्मान दाखवण्याची भाषा केल्यानंतर, गेल्या काही दिवसात सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या आहेत. सातत्यानं त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष टोकाला जाण्याची चिन्हं आहेत.

Leave Comments