By Editor on Monday, 23 October 2023
Category: महाराष्ट्र

[mymahanagar]राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे

सुप्रिया सुळेंची मागणी

पुणे : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे किंवा सर्व पक्षांची बैठक बोलवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही सुप्रिया सुळेंनी केले आहे. तसेच आरक्षणासंदर्भात आपण राज्य सरकारला जाब विचारला पाहिजे, असेही सुप्रिया सुळे मराठा तरुण आत्महत्यासंदर्भात बोलताना म्हणाल्या. यावेळी सुप्रिया सुळेंनी ड्रग्ज प्रकरणावरून राज्य सरकार आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

आज पेपरमध्ये 'मराठा आरक्षणाचे वचन पूर्ण करण्याचे', असे जाहिरात छापून आली आहे या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राज्यातील अनेक घटक आरक्षणाची मागणी करत आहेत. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज आरक्षण मागत आहे. यासंदर्भात बाहेर बोलण्यापेक्षा एक विशेष अधिवेशन बोलवावे. जगामध्ये जी परिस्थिती आहे. यात पॅलिस्टाईन आणि इस्रायल, रशियामध्ये जो वाद सुरू आहे. पण आपल्या सरकारने आरक्षणासंदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन किंवा सर्व पक्षांची बैठक या सरकारीने बोलवले पाहिजे", अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

राज्याची परिस्थिती गंभीर

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "महाराष्ट्रात आरक्षण असेल, शिक्षण असेल किंवा आरक्षणाचा मुद्दा असेल हे एवढे गंभीर आव्हाने आज राज्यासमोर आहे. मला विचारला तर सध्या राज्य हे प्रचंड अस्थिर आहे, अशा परिस्थितीत राज्य सरकारने सर्व पक्षांची बैठक बोलवावी." मराठा समाजाचे अनेक नेत्यांना गावात येण्यास मज्जाव केला आहे, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राज्यात इतकी अस्वस्थता असेल, तर राज्याच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने यांची नोंद घेतली पाहिजे. त्यांच्या मंत्र्यांची अडवणूक होत आहे तर जनतेत प्रचंड अस्वस्थ आहे. यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्व पक्षांची बैठक बोलवाली पाहिजे आणि यात चर्चा केली पाहिजे. हे तर चर्चेला देखील बसायला तयार नाही", असा आरोपही सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर केला आहे.

Maratha Reservation : The state government should call a special session; Demand for Supriya Sule ag

Leave Comments