By Editor on Wednesday, 15 March 2023
Category: महाराष्ट्र

[Azad Marathi]जुन्या पेन्शनबाबत सरकार वारंवार संभ्रम निर्माण करणारी भूमिका घेत आहे

सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

Mumbai – जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी काल संप पुकारून राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं केली. या संपात शासकीय, निम शासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसंच आरोग्य आणि जिल्हा परिषद कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीवरुन शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. जुन्या पेन्शनबाबत सरकार वारंवार संभ्रम निर्माण करणारी भूमिका घेत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.ही मोठी गंभीर बाब आहे.(Govt is repeatedly taking confusing stance on old pension: Supriya Sule).

कर्मचारी संपावर असल्यामुळे प्रशासन ठप्प असून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अनेक महत्त्वाच्या सेवा या संपामुळे खंडीत झाल्या.त्या पुर्ववत होणे अतिशय गरजेचे आहे.शासनाने तत्परतेने या सर्वांना विश्वासात घेऊन सन्मानजनक तोडगा काढण्याची गरज आहे. असं सुळे यांनी म्हटले आहे. 

जुन्या पेन्शनबाबत सरकार वारंवार संभ्रम निर्माण करणारी भूमिका घेत आहे; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल - azadmarathi.com

Leave Comments