संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) न्याय मिळावा, या मागणीसाठी मस्साजोगच्या (Massajog) ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. मस्साजोग गावात सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, विशेषतः तुमच्या आईची काळजी घ्या असे सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांच्याकडून देशमुख कुटुंबाच्या आरोग्याची देखील विचारपूस करण्यात आली.