By Editor on Saturday, 28 October 2023
Category: महाराष्ट्र

[Lakshya news]खा.सुप्रिया सुळे यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद

मुंबईकरांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आणिक व प्रतिक्षानगर, वडाळा येथील बेस्ट बस डेपोला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्युत सेवा विभागातील कायम व कंत्राटी कामगार, तसेच महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. तसेच राज्य सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कामगारांच्या या प्रश्नासंदर्भात लवकरच मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली जाणार आहेत. त्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेऊन कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. बेस्ट आणि मुंबईकरांचे अनोखे नाते आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन माणुसकीच्या नात्याने बेस्ट कामगरांना राज्य सरकारने न्याय देणे गरजेचे आहे. 

Leave Comments