पार्थ पवार यांच्यावर जमिनीचा घोटाळा केल्याचा आरोप प्रकरणी पार्थ पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पार्थ पवार यांच्याकडून आपण कोणतही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. जमीन खरेदी कारणासाठी नियमानुसारच प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवार यांच्याकडून नकार देण्यात आला. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? सविस्तर जाणून घेऊया.