By Editor on Tuesday, 16 May 2023
Category: महाराष्ट्र

[ABP MAJHA]अमोल कोल्हेंच्या 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा प्रयोग सुप्रिया सुळेंनी पाहिला

पोस्ट शेअर करत म्हणाल्या, 'अतिशय मोलाचे काम...'

Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सध्या 'शिवपुत्र संभाजी' (Shivputra Sambhaji) या महानाट्यामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अमोल कोल्हे हे या महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत. नुकताच 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचा प्रयोग पिंपरी चिंचवड येथे पार पडला. या प्रयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हजेरी लावली. 'शिवपुत्र संभाजी' हे महानाट्य पाहिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एक खास पोस्ट शेअर करुन या महानाट्याच्या टीमचे कौतुक केले आहे.  

सुप्रिया सुळे यांची पोस्ट

सुप्रिया सुळे यांनी 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचा प्रयोग पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारीत 'शिवपुत्र संभाजी ' या महानाट्याचा प्रयोग पिंपरी चिंचवड येथे पाहिला. हा अतिशय दर्जेदार असा कार्यक्रम आहे. खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी या महानाट्याच्या माध्यमातून अतिशय मोलाचे काम केले आहे. याबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. आपणही हे महानाट्य अवश्य पहा.याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय जगताप व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.' 

अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'पिंपरी चिंचवड येथील शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या आजच्या प्रयोगास राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गदर्शक खासदार सुप्रियाताई सुळे यांची सन्माननीय उपस्थिती! खूप खूप धन्यवाद' पिंपरी-चिंचवड शहरातील एचए मैदानावर 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचं सादरीकरण सुरु आहे. या महानाट्याचा मोफत पास मिळावा म्हणून पिंपरी पोलिसांनी धमकी दिल्याचा आरोप डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला होता. याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती.​

Leave Comments