महायुतीचा शपथविधी सोहळा काल पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. महायुतीचा शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीने राज्यात सरकार स्थापन केलं. मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी शपथ घेतली. याबद्दल तिघांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.