केंद्रासह राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू लोकसभा निवडणुकीत चांगलीच सरकली असून आता राज्यातील विधानसभा निवडणूक जसंजशी जवळ येईल तसंतसे सध्याचे जुमलेबाज सरकार फसव्या योजना आणून योजनांचा पाऊस पाडणार आहे परंतु महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत हीच जनता अशा फसव्या योजनांना न भुलता, या जुमलेबाज सरकारला सत्तेवरून खाली खेचेल व याच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास खा. सुळे यांनी व्यक्त केला. सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील यशवंतनगर,ता कराड येथे रविवारी आयोजित केलेल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या