By newseditor on Saturday, 10 February 2018
Category: महाराष्ट्र

हल्लाबोल आंदोलनात सुप्रिया सुळेंचा आदिवासी नृत्यावर ठेका

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारविरोधात सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरला.

हल्लाबोल आंदोलनाच्या दिवसाची सुरुवात वर्ध्यातून झाली. या आंदोलनात बिडी गावजवळ मेळघाटाहून आलेले काही आदिवासी मंडळी सहभागी झाले.

कोरकू आदिवासींच्या गादुली सुसुन या पारंपरिक नृत्याने हल्लाबोल पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी सुप्रिया सुळेंनी आदिवासींचं एक वाद्य हातात घेत त्यांच्यासोबत ठेका ठरला तर साडी नेसलेल्या एका चिमुकलीचं कौतुकही केलं.

पारंपरिक आदिवासी नृत्याने चौथ्या दिवसाचा #हल्लाबोल सुरू या #खोटारड्या सरकारवर.!!
आजचा मार्ग भिडी - कस्तुरबा ग्रामीण स्वास्थ्य केंद्र - रत्नापुर - दापोर
एकपाला फाटा -देवळी - हिंगणघाट फाटा
या सर्वांनी सामील व्हा.!! pic.twitter.com/wIjvfPD0mx
— Supriya Sule (@supriya_sule) 4 December 2017

तर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही पदयात्रेदरम्यान आदिवासी मंडळींसोबत फुगडी घातली.

दुसरीकडे एका नवरदेवाने हल्लाबोल पदयात्रेत सहभागी होऊन अजित पवार, सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत सेल्फीही काढला. विशेष म्हणजे अजित पवारांनी नवरदेवाला लग्नाचा आहेरही दिला.

हल्लाबोल आंदोलनात सुप्रिया सुळेंचा आदिवासी नृत्यावर ठेका

Leave Comments