सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा स्मारक कोसळणे ही अतिशय दुदैवी घटना आहे. पंतप्रधानांना उद्घाटनाला बोलावता मग पुतळा उभा करताना राज्य सरकारने याचा विचार केला नव्हता का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांचे स्मारक उभे करताना राज्य शासनाने ऊन, वारा, पाऊस याचा विचार केला नव्हता का ? या सरकारचा मी निषेध करते.