सुप्रिया ताईंनी सांगितलं खास कनेक्शन; दादांना दिलं टेन्शन
PauseUnmute0%Loaded: 16.50%Remaining Time -6:10Close Player
सोलापूर : अजित पवारांच्या (Ajit Pawar) गुलाबी जॅकेटची चर्चा सध्या सर्वांच्याच तोंडात असताना टेंभुर्णी येथील शिवस्वराज यात्रेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही गुलाबी साडीच नेसली होती. या विषयी सुप्रिया सुळेंना विचारले असता त्या म्हणाल्या , नाहीरे बाबा कोण कसले जॅकेट घालते मला माहीत नाही पण माझ्या मुलाचे गुलाबी साडी आवडते गाणे असल्याने मी गुलाबी साडी नेसली. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याने एकच हशा पिकला. सुप्रिया सुळे टेंभुर्णी येथील मेळाव्यात तुफानी बॅटिंग केली .
लाडक्या बहिणीच्या विषयावर बोलताना त्यांनी सध्या भर सभेत रवी राणा आणि महेश शिंदे यांचे ऑडिओ क्लिप ऐकवल्या आणि नंतर या आमदारांवर सडकून टीका केली. बहिणीच्या खात्यात पैसे देऊन परत घेऊन दाखवा असा सज्जड दमच सुळे यांनी या सत्ताधारी आमदारांना भरला. तुम्ही काय खिशातले पैसे देता काय तुमच्या? असा सवाल करत आमच्या कराच्या पैशातून तुम्ही हे पैसे देता लक्षात ठेवा असा इशाराही सुळे यांनी दिला .
आता महाराष्ट्राने ठरवले असून निर्णय तोच होणार, सुप्रिया सुळेंचा टोला
राज्य सरकारला कळून चुकले आहे की, आपण पुन्हा सत्तेत येत नाही , रोज नवनवीन सर्व्हेत हेच समोर येत असल्याने थोडे दिवस निवडणूक लांबवून काही योजना आणाव्यात , मग काही फरक पडेल असे या सरकारला वाटत असावे असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. मात्र आता महाराष्ट्राने ठरवले असून निर्णय तोच होणार असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला .
अजितदादा आले तर राखी बांधणार : सुप्रिया सुळे
अजितदादांनी नेमके काय वक्तव्य केले हे मी ऐकले नाही असे सांगताना राखी पौर्णिमेदिवशी माझा काय कार्यक्रम आहे माहीत नाही. प्रत्येक राखी पौर्णिमेला भावाकडून काही मागायचेच कशाला असे म्हणत अजितदादा आले तर राखी बांधणार असे सांगितले . सध्या आधी लगीन कोंढाण्याचे... महागाई भ्रष्टाचाराचे आणि राज्यातले प्रश्न सोडवू... मग दादांना राखी बांधू असेही सुळे यांनी सांगितले .